सातारा
“गोरेंच्या विरोधात काँग्रेसने फुंकले रणशिंग…”
सातारा (महेश पवार)
राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार असून खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहचून यावेळी माण विधानसभा मतदार संघातील निष्क्रीय भाजप उमेदवार हरवावा असा वडूज येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाला.
येथील फिनिक्स ऑगनायझेशन सभागृहात खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलाणी, तालुका ध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, उपसभापती विजयकुमार शिंदे, माण विधानसभा काँग्रेसचे प्रमुख डॉ. महेश गुरव, ओबीसे सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल भिसे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की खटाव तालुक्यात लोकसभे दरम्यान भाजपाने आर्थिक रणनितीचा वापर करून लोकशाहीतील निवडणूक प्रकिया वेगळ्या वळणावर नेहली मात्र तालुक्यातील काँग्रेस विचार सरणीचे मतदार व पदाधिकारी किंचीतही विचलीत झाले नाहित जातीयवादी पक्षाला राज्यात जनतेने लोकसभेदरम्यान स्पष्ट नाकारले असून येणाऱ्या विधान सभेत भाजपाला संपुष्टात आणण्याची धमक फक्त राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता मधेच आहे. त्यामुळे याक्षणा पासून भाजप विरोधी भूमिका कणखरपणे मांडण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. माढा लोकसभेत प्रचंड मतांनी भाजपा उमेदवाराचा पराभव हीच विधान सभेची नांदी ठरेल असा आत्मविश्वास ही देशमुख यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी उपसभापती विजयकुमार शिंदे दुष्काळी खटाव तालुक्यात भाजपाच्या आमदारांनी कायम दुजाभाव करून सापत्न भावाची वागणूक दिली तसेच शेती पाणी व पिण्याच्या पाण्याबाबत सत्ते चा गैरवापर करत येथील जनतेला तहानलेलीच ठेवले हे पाप त्यांच्या माथी असून निसर्गानेच येथील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवली यामुळे येथील जनतेला सर्व ज्ञात असून विधानसभा मतदान दिनाची आतुरतेने वाट पाहत आहेत प्रशासकीय यंत्रणेवर नाहक दबाव टाकत खटाव तालुक्याला वेठीस धरले मात्र आता जनता सुज्ञ झाली असून यापुढे कोणत्याच भुलभुलैयाला आणि नौटंकीला थारा देणार नाही हे निश्चित.
यावेळी प्रास्तावीक राजुभाई मुलाणी यांनी केले तर आभार डॅा.महेश गुरव यांनी मानले.यावेळी अमर कांबळे,सत्यवान कांबळे,माए खाडे,मुबारक मुल्ला,धनंजय निंबाळकर,संतोष जाधव,दादा सुर्यवंशी,अरविंद गायकवाड,परेश जाधव,ॲड.पी.डी.सावंत,किसनराव सानप,बोटे सर,श्रीरंग देवकर,मधुकर देवकर,दिनकर देवकर,किशोर ढोले,अभिजीत साबळे,सदाशिव खाडे,डॅा.नितीन जगदाळे,डॅा.नारायण जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस सर्वसमावेशक पक्ष: रणजितसिंह देशमुख
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व घटकांना समान न्याय देऊन सबलीकरण करून प्रतिनिधित्व काम करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष कधीच लोकांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन रणजितसिंह देशमुख यांनी केले.