google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

या प्राइम डे ला Amazon वर लाँच होणार 3,200 उत्पादने

या प्राइम डे ला लहान व्यावसायिक Amazon.in वर घर आणि स्वयंपाकघर, फॅशन आणि ग्रुमिंग, दागिने, हॅण्डमेड उत्पादने आणि इतर अनेक श्रेणींमध्ये 3200+ नवीन उत्पादने लाँच करत आहेत. बेहोमा, ड्रीम ऑफ ग्लोरी, ओरिका स्पाइसेस हे आणि इतर ब्रँड्स Amazon.in वर त्यांची हटके उत्पादने लाँच करतील, तसेच देशाच्या विविध भागांतील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. हजारो लहान व्यावसायिक Amazon.in वरील या बहुप्रतीक्षित शॉपिंग इव्हेंटमध्ये सहभागी होतील, जे भारतभरातील ग्राहकांना लाखो प्राइम-सक्षम उत्पादने ऑफर करतील.

“Amazon प्राइम डे ची भारतातील सर्वच जण वाट पाहात असतात. हा प्राइम डे आम्हाला आमच्या विक्रेते आणि ग्राहकांसाठी काहीतरी करण्यास मदत करतो. विशेषत: लहान आणि मध्यम व्यावसायिकांची सर्जनशीलता, उत्पादनातील नावीन्य आणि उद्योजकतेची भावना साजरी करून, सलग ८व्या वर्षी हा प्राइम डे सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. इव्हेंटच्या दोन दिवसांमध्ये, विक्रेत्यांना त्यांची उत्पादने आणि ब्रँड्स लाखो ग्राहकांसमोर मांडण्याची केवळ संधीच मिळणार नाही, तर देशभरातील 100% सेवायोग्य पिन कोड असलेल्या Amazon च्या विशाल ग्राहक वर्गात थेट प्रवेशही मिळेल. अशा शॉपिंग इव्हेंट्सद्वारे, लहान आणि मध्यम व्यावसायिकांना ई-कॉमर्सची शक्ती आत्मसात करण्यास सक्षम करणे आणि त्यांच्या यशासाठी नवीन मार्ग उघडणे हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे भारताच्या आर्थिक वाढीस हातभार लावणाऱ्या ऑनलाइन मार्केटप्लेसला देखील चालना मिळते,” असे अमित नंदा, ॲमेझॉन इंडियाचे सेलिंग पार्टनर सर्व्हिसेस संचालक म्हणाले.

लहान आणि मध्यम व्यवसाय प्राइम डे 2024 ची तयारी करण्यासाठी Amazon वर उपलब्ध साधनांचा व वैशिष्ट्यांचा एक मजबूत संच वापरू शकतात. एक सुव्यवस्थित स्वयंसेवा नोंदणी प्रक्रिया (SSR 2.0) विक्रेत्यांसाठी Amazon.in वर सुरुवात करणे सोपे बनवते. बहुभाषा समर्थन, सुलभ नोंदणी अशा पर्यायांचाही याला फायदा होतो. विक्रेते सेल इव्हेंट प्लॅनर वापरू शकतात आणि प्राइम डेच्या दरम्यान उत्तम ऑफर्स देऊ शकतात. इन्व्हेंटरी प्लॅनिंगवर हे टूल अनेक विक्रीच्या नवनवीन युक्त्या, तसेच शिफारसीही देते, ज्यामुळे विक्रेत्यांना त्यांची उत्पादने अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याची विक्रीही वाढविता येते. द न्यू सेलर सक्सेस सेंटर हा ऑनबोर्डिंग बडी आहे, जो विक्रेत्यांना त्यांची ऑनलाइन दुकाने उभारण्यासाठी, वाढीचे महत्त्वाचे टप्पे गाठणे आणि जाहिराती, प्राइम व डील यांसारख्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी अगदी पद्धतशीर मार्गदर्शन करतो.

बेहोमाचे मालक निखिल जैन म्हणाले, “प्राइम डे 2024 मध्ये आमचे नवनवीन हॅन्डमेड होम डेकोर पीस लाँच करण्यासाठी बेहोमा उत्साहित आहे. स्टायलिश आणि नावीन्यपूर्ण डिझाइन्समध्ये खास असणारा आधुनिक होम डेकोर ब्रँड म्हणून बेहोमा ओळखला जातो. धातूचा सुबक असा सोनेरी मेटल प्लांटर सेट आणि सोन्याच्या फिनिशिंगमधील स्टायलिश ड्रॉप-आकाराच्या मेटल फुलदाणीसह आमची नवनवीन उत्पादने ग्राहकांसमोर ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी प्राइम डे आम्हाला एक अनोखे व्यासपीठ देतो आणि आमच्या अनोख्या हॅण्डमेड उत्पादनांना ठेवण्याची जागा सोईस्कर करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत.”

Amazon ने Amazon Seller App ची कार्यक्षमताही सतत सुधारली आहे, विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय सेट करण्यासाठी आणि अखंडित सुरू राहावेत, यासाठी सक्षम बनवते. कुपन, डील आणि प्रायोजित उत्पादन मोहीम राबवत विक्रेते आता त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण विक्री ॲपद्वारे करू शकतात. हे ॲप परस्परसंवादी व्यवसाय मेट्रिक्सही प्रदान करते, ज्यामुळे विक्रेते आपल्याच कामगिरीचे विश्लेषण करू शकतात, तसेच आपली कामगिरी कशी असेल, याचा निर्देशकांच्या साहाय्याने मागोवा घेऊ शकतात.

लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी त्यांची ई-कॉमर्स फूटप्रिंट मजबूत करण्यासाठी, अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि नवीन उत्पादने लाँच करण्याची प्राइम डे 2024 ही अनमोल संधी आहे. विक्रीतील संभाव्य वाढीचा विचार करत, SMB त्यांच्या ब्रँडचा अधिकाधिक विस्तार करू शकतात, नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकतात आणि शाश्वत वाढीसाठी ई-कॉमर्सद्वारे त्यांचा पाया मजबूत करू शकतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!