सज्जनगड व्यावसायिकांचा वन हद्दीत कचरा; वन विभाग अलर्ट
सातारा (महेश पवार) :
किल्ले सज्जनगड गेल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे तसेच त्यांची टीम उपस्थित होती. कचरा स्वच्छ करत असताना गडावर बस स्थानक परिसर पायरी मार्ग तसेच गडावरील मोकळ्या जागेत कचऱ्यांचे ढिगारे आढळले त्यांनी तात्काळ विस्तार अधिकारी शंतनू राक्षे तसेच आरोग्य विभागाला अलर्ट करत कचरा करणारे व्यावसायिक दोन्ही संस्थान तसेच स्थानिकांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.
यावेळी वन विभाग यांनाही आपल्या जागेत कचरा डंपिंग केला जातो याची माहिती समजतात सातारा तालुक्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांनी तात्काळ परळीचे वन परिमंडल अधिकारी सोळंकी तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना गडावर पाठवून परिस्थितीची पाहणी करायला सांगितले वन परिमंडल अधिकारी सोळंकी यांनी वन विभागाच्या हद्दीत कचरा आहे याची खातरजमा करत यावेळी स्थानिक व्यावसायिक ग्रामस्थ तसेच दोन्ही संस्था ंमध्ये जाऊन त्यांना समज दिली असून यापुढे वन हद्दीत कचरा टाकल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी विनंती वजा इशारा ही दिला आहे . ग्रामपंचायत ने व्यावसायिकांना तसेच दोन्ही संस्थांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची सूचनाही यावेळी वन विभागाने केली आहे.
सांडपाणी ही वन हद्दीत !
गडावरील सांडपाणी तसेच राहिलेले अन्न हे वन हद्दीत सोडले जाते याबाबत वन विभागाने काही दिवसाची मुदत दिली आहे ग्रामपंचायत तिने याबाबत लक्ष घालून त्यांना तात्काळ सांडपाण्याची व्यवस्था करून द्यावी अन्यथा सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.