
सातारा (महेश पवार) :
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामध्ये शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्य गोष्टी मांडण्यात आल्याचा आरोप करत शिर्के घराण्यातील सुहास राजेशिर्के यांनी हा चित्रपट प्रदर्शनाआधी राजघराण्यातील लोकांना दाखवावा आणि मगच तो प्रदर्शित करावा अशी मागणी केली आहे. जर छावा चित्रपटात राजघराण्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला तर आम्ही चित्रपट बंद पाडू असा इशारा देखील राजेश शिर्के यांनी दिला आहे.
त्याचबरोबर यापुढे ऐतिहासिक चित्रपट काढताना राजघराण्यांना विश्वासात घेऊनच आणि अशा चित्रपट काढणाऱ्यांसाठी कायदा पारित केला जावा अशी मागणी देखील राजेशिर्के यांनी केली आहे.