पर्वरीत 475 कोटी रूपये खर्चून होणार नवा उड्डाणपूल
पर्वरी:
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्वरीतील नियोजित उड्डाणपुलासाठी निविदा जारी केली होती. या पुलासाठी जीएसटी वगळून 474.64 कोटी रूपये खर्च येणार आहे.
हा उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चा भाग असणार आहे. 24 महिने म्हणजेच दोन वर्षात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. CPPP पोर्टल वर ही निविदा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 22 जूनपर्यंत आर्थिक आणि तांत्रिक निविदा भरायची मुदत होती.
या निविदा 26 जून रोजी खुल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, ज्यांना कुणाला या पुलाचे काम मिळेल त्यांना 10 वर्षांसाठी पुलाची देखभाल-दुरूस्ती करावी लागणार आहे.