गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै
Ranjita Pai : गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
रंजिता पै यांनी वयाच्या 45व्या वर्षी मास्टर्स इन पब्लिक सोशल वर्क हा अभ्यासक्रम पुर्ण केला असून संशोधन कार्यामध्ये एम फार्म पदवी मिळविली आहे. तसेच सहा महिने कारवारमधील महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणुनही काम केलेले आहे.
गोवा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या पदाला व पिडित महिलांना योग्य न्याय मिळवुन देण्याचा आपला प्रयत्न असेल असे गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या रंजिता पै यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
रंजिता पै यांनी मडगाव भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा, मडगाव भाजप मंडळाच्या सरचिटणीस व 2020 पासुन राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी राहिल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, शर्मद पै रायतुरकर, मडगाव मधील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.