google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘का’ लॉन्च केली Amazon ने क्रिएटर युनिव्हर्सिटी?


बंगलोर :

Amazon.in ने क्रिएटर युनिव्हर्सिटी आणि क्रिएटर कनेक्ट सुरु केल्याची घोषणा केली आहे. क्रिएटर युनिव्हर्सिटी हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे जो कन्टेन्ट क्रिएटर्सना सध्याच्या वेगवान क्रिएटर अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःची भरभराट करण्यासाठी आवश्यक साधने व माहिती पुरवून सक्षम बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. सध्याच्या लोकप्रिय इन्फ्ल्यूएंसर्सपासून नव्याने कन्टेन्ट बनवत असलेल्यांपर्यंत सर्वांना यामध्ये सहभागी होता येईल. यातील संसाधनांची निवड अतिशय काळजीपूर्वक करण्यात आली असून, सहभागी होणाऱ्यांना मूलभूत माहिती, व्यावहारिक धोरणे पुरवून ऍमेझॉन मार्केटप्लेसवर शाश्वत व्यवसायांना चालना द्यावी हा यामागचा उद्देश आहे.



क्रिएटर कनेक्टमध्ये इन-पर्सन इव्हेंट्सची एक सीरिज असणार आहे जी क्रिएटर्सचे परस्परांमधील संबंध, शिक्षण आणि वृद्धी यांना ऍमेझॉन इकोसिस्टिममध्ये चालना देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. महत्त्वाच्या सेलच्या वेळी या इव्हेंट्सचे आयोजन करण्यात येईल. आगामी प्रमोशन्ससाठी उत्साह आणि उत्कंठा निर्माण करणे व ऍमेझॉन इन्फ्ल्यूएंसर प्रोग्रामकडे नवीन क्रिएटर्सना आकर्षित करणे हे ऍमेझॉनचे दोन प्रमुख उद्देश आहेत. क्रिएटर कनेक्टमध्ये विविध संवादात्मक अनुभव मिळतील, यामध्ये इन्फ्ल्यूएंसर्सनी घेतलेल्या कार्यशाळा, ऍमेझॉन लीडर्स व प्रसिद्ध क्रिएटर्सना भेटण्याची संधी, उत्पादनांचे प्रदर्शन, ट्रेन्डबाबत चर्चा अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश असेल. “अ समर एस्केप” ही पहिली क्रिएटर कनेक्ट इव्हेन्ट ३ जून २०२४ रोजी मुंबईत सुरु होत आहे. ऍमेझॉन फॅशनच्या वॉर्डरोब रिफ्रेश सेलला अनुरूप ठरेल अशी फॅशन व लाइफस्टाइल क्रिएटर्सची कम्युनिटी निर्माण करण्यावर भर दिला जाईल.


ऍमेझॉनचे  किशोर थोटा – डायरेक्टर, शॉपिंग एक्स्पीरियंस, भारत व इमर्जिंग मार्केट्स यांनी सांगितले, “आजच्या ग्राहकांवर कन्टेन्ट क्रिएटर्सचा प्रभाव किती जास्त आहे ते ऍमेझॉनमध्ये आम्ही अनुभवत आहोत. या क्रिएटर्सना सक्षम बनवण्यासाठी आम्ही क्रिएटर युनिव्हर्सिटी आणि क्रिएटर कनेक्ट सुरु करत आहोत. यामध्ये प्रसिद्ध तसेच नवीन क्रिएटर्सना सहभागी करवून घेतले जाईल, ऍमेझॉन इकोसिस्टिममध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि माहिती त्यांना पुरवली जाईल. या प्रोग्राम्समध्ये क्रिएटर्सना मौल्यवान संसाधनांचा लाभ घेता येईल, उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसोबत संबंध व संवाद साधता येईल व आमच्या प्लॅटफॉर्मवर शाश्वत व्यवसाय उभारता येईल. क्रिएटर्स एकमेकांकडून शिकू शकतील आणि आमच्या ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करतील अशा समन्वयातून निर्माण होणाऱ्या समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”


क्रिएटर युनिव्हर्सिटीचे प्रमुख लाभ
क्रिएटर कनेक्ट: ऍमेझॉन क्रिएटर कनेक्ट इव्हेंट्सचे आयोजन करेल, क्रिएटर्सना एकमेकांसोबत संबंध व संवाद करण्यासाठी, शिकण्यासाठी, वाढ करण्यासाठी आणि ऍमेझॉन इकोसिस्टिममध्ये पुढे जाण्यासाठी एक अनोखा प्लॅटफॉर्म पुरवला जाईल. वॉर्डरोब रिफ्रेश सेल आणि ऍमेझॉनवरील प्रमुख इव्हेंट्सच्या वेळी उत्साह, उत्सुकता वाढवण्यासाठी या इव्हेंट्सचे आयोजन केले जाईल. क्रिएटर कनेक्ट हा जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नवीन व्यक्तींना ऍमेझॉन इन्फ्ल्यूएंसर प्रोग्राममध्ये आकर्षित करण्यासाठी प्रभावी मंच ठरेल. पहिले क्रिएटर कनेक्ट ३ जून २०२४ रोजी मुंबईमध्ये आयोजित केले जाईल. इतर शहरांमध्ये देखील आयोजन करण्याचे ठरवले जात आहे. 


सर्वसमावेशक शैक्षणिक अभ्यासक्रम: क्रिएटर युनिव्हर्सिटीमध्ये माहितीपूर्ण कन्टेन्ट खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करवून दिला जाईल. कन्टेन्ट क्रिएटर्सच्या विविध गरजा पूर्ण व्हाव्यात यादृष्टीने अतिशय विचारपूर्वक याची आखणी करण्यात आली आहे. सर्वसमावेशक अभ्यासक्रमामध्ये सखोल व्हिडिओ ट्युटोरियल्स, माहितीपूर्ण लेख आणि संवादात्मक कार्यशाळा यांचा समावेश असेल. दर्शक संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्यापासून ऍमेझॉन इकोसिस्टिममध्ये जास्तीत जास्त चांगली कामगिरी बजावण्यासाठी उपयुक्त कन्टेन्ट निर्माण करण्यापर्यंत विविध विषयांचा यामध्ये समावेश असेल.


उद्योगक्षेत्रातील दिग्गजांकडून माहिती व मार्गदर्शन: सध्याच्या लोकप्रिय आणि यशस्वी ऍमेझॉन क्रिएटर्स व उद्योगक्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवांमधून मौल्यवान माहिती मिळवता येईल. क्रिएटर युनिव्हर्सिटीमध्ये माहितीपूर्ण केस स्टडीज व टेस्टिमोनियल्स असतील, ज्यामुळे यामध्ये सहभागी झालेल्यांना इतरांचे यश व त्यांना आलेल्या आव्हानांमधून शिकण्याची संधी मिळेल. 


यशस्वी होण्यासाठी धोरणे, जी अंमलात आणली जाऊ शकतील: क्रिएटर युनिव्हर्सिटी सहभागी झालेल्यांना ऍमेझॉनवर कन्टेन्ट क्रिएशनच्या प्रत्येक पैलूंबाबत व्यावहारिक मार्गदर्शन पुरवते. सुचवण्यासाठी सुयोग्य उत्पादने कशी निवडावीत, आकर्षक व दर्शकांना जोडून ठेवणारा कन्टेन्ट कसा तयार करावा आणि इच्छित दर्शकांना ऍमेझॉनकडे कसे वळवावे याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन पुरवले जाईल.


समन्वयात्मक समुदायाला चालना: क्रिएटर युनिव्हर्सिटी क्रिएटर्सच्या सक्रिय समुदायाला चालना देते, संबंध आणि समन्वय यासाठी प्रभावी मंच पुरवते. माहितीची देवाणघेवाण व्हावी आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी विशेष फोरममार्फत माहितीपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होता येईल. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!