
अॅक्सिस बँक–एफएचआरएआय करार; आदरातिथ्य क्षेत्राला बँकिंग पाठबळ
नवी दिल्ली : Axis Bank ने आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था Federation of Hotel and Restaurant Associations of India (एफएचआरएआय) सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराद्वारे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि संबंधित व्यवसायांशी बँकेचे सहकार्य अधिक बळकट होणार आहे.
या भागीदारीअंतर्गत, अॅक्सिस बँक पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी विशेष बँकिंग व व्यवहार सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यात पीओएस भाड्यावर सवलत, रोख व्यवस्थापन सेवा, तसेच पेमेंट सोल्यूशन सेटअप शुल्कात सवलतीसह विशेष चालू खात्यांच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. पात्र सदस्यांना गरजेनुसार सानुकूलित वित्तीय उत्पादनेही उपलब्ध होतील.
अॅक्सिस बँकेचे कमर्शियल बँकिंग प्रमुख विजय शेट्टी यांनी सांगितले की, वाढते उत्पन्न, देशांतर्गत पर्यटन आणि पायाभूत सुविधांमधील सुधारणा यामुळे आदरातिथ्य क्षेत्रात मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर एफएचआरएआयसह भागीदारीतून क्षेत्रनिहाय वित्तीय उपाय देण्यावर भर दिला जाणार आहे.
कार्यकारी उपाध्यक्ष श्रीकेश पी. यांनी विशेषतः उत्तर प्रदेशसारख्या बाजारपेठांमध्ये हॉटेल्स, बँक्वेट्स आणि केटरिंग व्यवसायात वाढीच्या संधी असल्याचे नमूद केले.
एफएचआरएआयचे अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल यांनी या सहकार्यामुळे सदस्यांना वित्तीय सेवांपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमाचा भाग म्हणून, अॅक्सिस बँकेने लखनौ येथे झालेल्या ‘वेडिंग अँड माइस टुरिझम कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभाग घेतला. बँकेने या क्षेत्रासाठीच्या आपल्या सेवा आणि क्षमता सादर केल्या.
बँकेने सांगितले की, मुदत कर्ज, खेळते भांडवल, संरचित वित्तपुरवठा आणि समर्पित संबंध व्यवस्थापनाच्या माध्यमातून आदरातिथ्य क्षेत्राला पुढेही पाठबळ दिले जाईल.

