अर्थमत

आता ट्रेन तिकिट रद्द केल्यावर मिळणार ‘इतके’ टक्के परतावा

मुंबई :

भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने आज पेटीएम सुपर अॅप वापरकर्त्यांना ‘कॅन्सल प्रोटेक्ट’सह ट्रेन तिकिट बुकिंग्जवर मोफत कॅन्सलेशनचा लाभ घेण्यासाठी सक्षम केल्याची घोषणा केली.

‘कॅन्सल प्रोटेक्ट’ कव्हरसह वापरकर्ते ट्रेन तिकिटाच्या नियोजित वेळेच्या किमान ६ तास आधी किंवा चार्ट तयार होण्यापूर्वी, यापैकी जे आधी असेल, पेटीएमद्वारे रद्द केलेल्या ट्रेन तिकिट बुकिंगवर १०० टक्के इन्स्टंट रिफंड क्लेम करू शकतात. ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ प्रवाशांना कोणतेही प्रश्न न विचारता कुठेही, कधीही, नियमित आणि तत्काळ रेल्वे तिकिटे रद्द करण्यास सक्षम करते.

पेटीएमसह वापरकर्ते पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून ट्रेन तिकिटांवर शून्य पेमेंट शुल्कांचा आनंद घेऊ शकतात. वापरकर्ते तत्काळ तिकिटे बुक करू शकतात, लाइव्ह ट्रेन रनिंग स्टेटस तपासू शकतात, प्लॅटफॉर्म क्रमांक ट्रॅक करू शकतात आणि पेटीएम किंवा इतर व्यासपीठांवर बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पीएनआर तपासू शकतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: