
गोवा
बालभवनचे उन्हाळी शिबीर ७ एप्रिल पासून
पणजी :
लहान मुलांना उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता यावा या उद्देशाने पणजी बालभवन बरोबर संपुर्ण गोव्यातील बालभवन केंद्रामधून उन्हाळी शिबीर ७ एप्रिल पासून सुरू होणार असून त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या शिबीरामध्ये मुलांना चित्रकला, हस्तकला, मुर्तीकला, संगीत (हार्मोनिअम, तबला, गायन, गीटार) नृत्य कथ्थक भरतनाट्यम, कथाकतन, संगणक, नाट्य, खेळ, योगा, या नियमित कार्यालापाबरोबर, विशेष शिबीरांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
५ ते १६ वयोगटासाठी प्रवेश खुला आहे. पणजी बालभवनमध्ये ५ ते ८ वयोगटासाठी सकाळच्या सत्रात (९.३० ते १२.३०) तर ९ ते १६ वयोगटासाठी दुपारच्या सत्रात (२.३० ते ५.३०) या वेळेत प्रत्येक सत्रासाठी ३०० मुलांना प्रवेश दिला जाईल.
प्रवेश घेण्यासाठी इच्छूक पालकांनी बालभवन कांपाल पणजी येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश देण्यात येईल. बालभवनच्या केंद्रात प्रवेश घेण्यासाठी त्या भागातील केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा. प्रवेश अर्ज दिनांक १ एप्रिल पासुन उपलब्ध आहेत असे बालभवनचे संचालक मनोज सावईकर यांनी कळवले आहे.