म्हादईसाठी मानवी साखळी…
काँग्रेस पक्ष नेहमीच गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठी वचनबद्ध राहिला आहे. म्हादई नदीसाठी आम्ही नेहमीच लढलो आहोत आणि आमचा “म्हादई जागर” आमची जीवनदायीनी आई म्हादईसाठी सुरूच राहील, असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केले. म्हादई जागर या मानवी साखळीत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.
आज मी तसेच केपेंचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा, हळदोणाचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा, माध्यम प्रमूख अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस एव्हरसन वालीस, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानवी साखळीत सहभाग घेतला कारण काँग्रेस पक्षाचे नेहमीच ‘गोवा प्रथम’ हेच धोरण आहे.
कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला बेकायदेशीररीत्या मंजूरी देणारे हे ट्रबल इंजिन भाजप सरकार आहे. केंद्र सरकारवर दबाव आणून डीपीआर मागे घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची आहे, असेही आलेमाव यांनी यावेळी नमूद केले.