google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘महान गोंयकारांचे स्मरण करा’

विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली केळेकर-सरदेसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण

मडगाव :

1925 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा 2024 मध्ये 100 वा वाढदिवस असतो. भाजप सरकार 18 जानेवारी 2024 रोजी मनोहरराय सरदेसाई यांचा 100 वा वाढदिवस विसरले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्रबाब केळेकर यांचा शंभरावा जन्मदिन 7 मार्च रोजी आहे व त्याच दिवशी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर दिवस शासकीय कार्यक्रमाने साजरा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

सरदेसाई आणि केळेकर यांची शताब्दी 2025 मध्ये सुरू होत असल्याचा विधानसभेत दावा करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा एक व्हिडिओ जारी करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणिताचे धडे घेणे गरजेचे आहे असा टोला हाणला.

भाजप सरकार मनोहरराय सरदेसाई, रवींद्रबाब केळेकर आणि इतर महान गोंयकारानाच महत्व न देता बाजूला सारत असल्याचे दिसून येत आहे. गोव्यासाठी योगदान दिलेल्या गोमंतकीयांची माहिती राखण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

अलिकडच्या काळात भाजप सरकारने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय वीरांच्या नावाने उत्सव साजरे केले. दुर्दैवाने, महान गोमंतकीयांचे स्मरण करताना सरकारकडे तोच जोश आणि उत्साह दिसत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.

गोव्यातील थोर कवी मनोहरराय सरदेसाई यांची जन्मशताब्दी साजरी करण्यास सरकार विसरले हा मुद्दा मी गेल्या विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चुकीची गणिते मांडून सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. 2024 वर्षातच 1925 मध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होते, असा दावायुरी आलेमाव यांनी केला.

https://x.com/yurialemao9/status/1764540292844355780?s=46&t=0ra0gnqUTsglV4j4uw5pkg

 

सामान्य प्रशासन विभाग किंवा प्रोटोकॉल विभागाकडे स्वातंत्र्यसैनिकांसह महान गोमंतकीयांची कसलीच माहिती उपलब्ध नाही. माहिती व प्रसिद्धी खातेही इतरांकडे बोट दाखवते. महान गोमंतकीयांच्या कार्याची नोंद ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक खास विभाग जाहिर करावा व सर्व माहिती सदर विभागानेच संकलीत करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

अनेक कोटी खर्च करून मेगा इव्हेंट आयोजित करण्यात काही अर्थ नाही. गोवा सरकारने पुढील पिढ्यांना महान गोमंतकीयांची ओळख करुन देणारे व त्यांच्या योगदानाची माहिती मिळण्यास मदत होईल असे कार्यक्रम आयोजीत करणे गरजेचे आहे असे युरी आलेमाव म्हणाले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!