‘महाविकास आघाडीचा राग प्रकाश आंबेडकर भाजपवर काढताहेत’
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात 17 लाख कुटुंबांनी देश सोडला या आरोपावर म्हणाले प्रतिक्रिया देत आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना सन्मान दिला नाही आणि आपला राग भाजपवर काढत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपेक्षेप्रमाणेच सरकार चालवत आहोत आणि चालवणार.
महायुती एका ध्येयाने काम करत आहे आणि विकसित भारत बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे हे आमचे ध्येय आहे.
48 जागांवर उमेदवार कोण, चिन्ह कोण, हे त्याहूनही महत्त्वाचे आहेत, पण ते उमेदवार मोदींजींसोबत आहे का ते महत्वाचं, असे देखील अतुल भातखळकर म्हणाले आहेत.