पंचायत निवडणूक ; काणकोण काँग्रेसची उद्या बैठक
काणकोण :
पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने त्या संबंधी विचारविनीमय करण्यासाठी काणकोण तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व हितचिंतक यांची सोमवार दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता जीएम गार्डन, श्रीस्थळ, ग्रामपंचायत समोर बैठक घेण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस नेते जनार्दन भांडारी यांनी म्हटले आहे.
जे काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक पंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत किंवा एखाद्या कॉंग्रेस कार्यकर्त्यास समर्थन देण्याचा त्यांचा विचार आहे त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित रहावे. याच बैठकीत बहुतेक पंचायत प्रभागांचे काँग्रेस समर्थक उमेदवार निश्चित केले जातील अशी माहिती जनार्दन भांडारी यांनी दिली.