google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मडगावच्या मलनिस्सारणावरून प्रभव नायक यांचे दिगंबर नायकांवर शरसंधान

मडगाव :

माझे आजोबा आणि मडगावचे माजी आमदार अनंत उर्फ बाबू नायक यांनी ८०च्या दशकात मडगावमध्ये भूमिगत मलनिस्सारण वाहिनी योजनेची सुरुवात केली होती. खेदाची गोष्ट म्हणजे, विद्यमान आमदार दिगंबर कामत गेल्या ३० वर्षांत सदर पूर्ण करू शकले नाहीत. २००७ ते २०१२ पर्यंत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी राहुनही त्यांना आपल्या कार्यकाळात ते काम पूर्ण करता आले नाही, अशी बोचरी टीका मडगावचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.


मडगावात मलनिस्सारण प्रकल्पाच्या पंपांमध्ये बिघाड, सांडपाणी चेंबरचे तुंबणे इत्यादींमुळे वारंवार सांडपाणी ओसंडून उघड्यावर वाहण्याच्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रभव नायक यांनी मडगाव येथील मलनिस्सारण प्रणाली प्रकल्पावर झालेल्या खर्चाचे सर्वंकष ऑडीट करण्याची मागणी केली आहे.

सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन टाकताना वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जात नाही. बेकायदेशीर कामे केली जातात त्यामुळे पाईपलाईन तुंबणे, चेंबर तुंबणे आणि इतर समस्या उद्भवतात, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

सीवरेज नेटवर्क आणि मलनिस्सारण प्रकल्पांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश केला आहे. मडगावच्या आमदारांचे लक्ष फक्त “स्वंय स्वार्थ” आणि “घराणेशाही” वर आहे. मलनिस्सारण कामाच्या कंत्राटदारांकडून मलई मिळत  असल्यानेच  मडगावच्या आमदारांनी मलनिस्सारण कामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे कानाडोळा केला, असा आरोप प्रभव नायक यांनी केला.

मडगावचे आमदार दिगंबर कामत हे त्यांच्या गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही या अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करू शकले नाहीत याचे मला खरच वाईट वाटते. माझ्या आजोबांना हा प्रकल्प ऐंशीच्या दशकात सुरू करण्याची दूरदृष्टी होती याचा मला अभिमान वाटतो. मडगावच्या सर्व दुरवस्थेला जबाबदार असलेले मडगावचे बेजबाबदार आमदार बदलण्याची वेळ आली आहे, असे प्रभव नायक म्हणाले.

मडगावकरांनी आत्मपरीक्षण करून आता मडगावात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. मडगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगर नियोजक, अभियंते, वास्तुविषारद तसेच नागरीकांना विश्वासात घेवून  मडगावचो आवाज लवकरच एक कृती आराखडा तयार करणार आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!