google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

Goa Carnival: पणजीत 10 फेब्रुवारीला कार्निव्‍हल

Goa Carnival: पणजीत व्‍हिवा कार्निव्हल दि. 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्‍यात आला आहे. ही परेड बांदोडकर मार्गावर 10 रोजी काढली जाईल. दरम्‍यान, कार्निव्हलसाठी 58 वर्षे योगदान देणारे फ्रांकित मार्टिन्‍स यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती पणजी कार्निव्हल समितीचे अध्‍यक्ष तथा महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मोन्‍सेरात बोलत होते. याप्रसंगी आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक बेंटो लॉरेन्‍स, समिती सचिव तथा अभियंते विवेक पार्सेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

goa carnival

मोन्सेरात म्हणाले, या तीन दिवसांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणाऱ्या ‘सांबा स्क्वेअर’ची उभारणी गार्सिया उद्यानाजवळील रस्त्यावर केली जाणार आहे.

तेथे नील रिबेरो यांचाही कार्यक्रम होईल. या सांबा स्क्वेअरमध्ये जाण्यासाठी शुल्क आकारले जाते. शिवाय तेथील स्टॉल्‍सना दिवसाप्रमाणे महानगरपालिका भाडे आकारते. त्यातून चांगला महसूल प्राप्त होत असतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!