सिने फॅशन ओव्हर द डिकेड्स: पाॅवर्ड बाय पिलर्स ऑफ ह्युमॅनिटी
55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक भाग म्हणून सिने फॅशन ओव्हर द डिकेड्स: पॉवर्ड बाय पिलर्स ऑफ ह्युमॅनिटी हा फॅशन शो इफ्फीएस्टा उत्सवादरम्यान झाला.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एन आय एफ टी)च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला कमला अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टच्या सर्वसमावेशक प्रयत्नांची जोड देऊन या अनोख्या कार्यक्रमाद्वारे फॅशनच्या माध्यमातून भारतीय चित्रपटाची उत्क्रांती साजरी झाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने झालेला हा कार्यक्रम कला, फॅशन आणि भारतीय संस्कृतीचा चैतन्यपूर्ण उत्सव होता.
या कार्यक्रमात 36 खास डिझाईन्स दाखवण्यात आली, ज्या भारतीय सिनेमाच्या सहा आयकॉनिक युगांपासून प्रेरित आहेत, ज्या प्रत्येक कालखंडाची शैली आणि भावना प्रतिबिंबित करतात. विशेष दिव्यांग व्यक्तींनी व्यावसायिक मॉडेल्सच्या बरोबरीने पहिल्यांदाच चालत, वैविध्याचे दर्शन घडवत तसेच फॅशनच्या माध्यमातून व्यक्तींना सक्षम बनवून कार्यक्रमाला एक नवीन आयाम जोडला.