गोवा

“चकचकीत मडगाव” स्वच्छता मोहिमेला वेग; ‘मडगांवचो आवाज’चा पुढाकार

मडगाव : युवा नेते प्रभव नायक यांच्या नेतृत्वाखाली मडगांवचो आवाजतर्फे सुरू करण्यात आलेल्या “चकचकीत मडगाव” स्वच्छता मोहिमेला आता चांगलाच वेग आला असून, दुसऱ्या टप्प्यात “आमचे मालभाट” उपक्रमाला पाठिंबा देत ही मोहीम राबविण्यात आली.


या मोहिमेदरम्यान बागायती कचरा, प्लास्टिक आणि इतर घनकचऱ्याचे मोठे ढिगारे हटविण्यात आले, ज्यामुळे अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचा सामना करणाऱ्या स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.


स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे उत्साहित होत, प्रभव नायक यांनी सांगितले की “चकचकीत मडगाव” मोहीम आता इतर वॉर्डांमध्येही राबविण्यात येणार असून स्वच्छ परिसर आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, मडगाव नगरपालिकेकडून कचरा व्यवस्थापनात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. वारंवार तक्रारी करूनही वेळेवर कारवाई होत नसल्याने नागरिक आणि सामाजिक संस्थांना पुढाकार घ्यावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.


नायक यांनी पुढे सांगितले की, गेल्या आठवड्यात हाती घेतलेल्या “चकचकीत मडगाव” स्वच्छता मोहीमेच्या पहिल्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात कचरा हटविण्यात आला होता. यावरुन शहरातील स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि तत्परतेने काम करण्याची गरज अधोरेखित होते, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!