ड्रग्ज विरोधातील मोहीम बळकट होणार : मुख्यमंत्री
अमली पदार्थ (Drugs) विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी आज गोव्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या सोबत एक महत्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत गोव्यातील अंमली पदार्थ आणि बेकायदा रेती उत्खनन प्रकरणाची माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी समाजविघातक कृती विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या देशभर गाजत असलेल्या अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणात गोव्यातील अंमली पदार्थांचा मुद्या पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, गुरूवारी (दि.01) कुडचडे येथे वाळू माफियांच्या गोळीबारात परप्रांतिय कामगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज दोन्ही विषयांवर गोव्यातील प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाला बळकटी देऊन, समाज विघातक कृती कणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातून अंमली पदार्थाची पाळमुळं नष्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या तीन महिन्यात गोव्यातून ड्रग्जची पाळमुंळ नष्ट करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. गोव्यात येणारे पर्यटक आनंद लुटण्यासाठी येतात न की ड्रग घेण्यासाठी हा मेसेज लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे. असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.