google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

‘गुजरात एक वेगळा देश होणार आहे का?’

मुंबई:

एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीवर खापर फोडत असताना विरोधकही सरकार केंद्र सरकाविरोधात आवाज उठवला जात नसल्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही सरकारवर टीका केली असून इतर राज्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

“डायमंड उद्योग आधीच सूरतला आहे. गुजरातमध्ये बऱ्यापैकी या उद्योगाने जम बसवला आहे. सराफा व्यापारही तिथे स्थलांतरित होत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं इंटरनॅशन ट्रेडिंग गुजरातमधून करण्याची भूमिका घेतली जात आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का? अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली आहे,” असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे. “देशातील सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असून, हे इतर राज्यांसाठी अन्यायकारक आहे,” असंही सतेज पाटील म्हणाले आहेत.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी हा समारंभ होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!