नव्या मंत्रिमंडळाचा आजच होणार शपथविधी
मुंबई:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तास्थपानेसंदर्भात सध्या सुरु असणाऱ्या बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. गोव्यामधून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे ३९ बंडखोर शिवसेना आमदारांचं समर्थन भाजपाला असल्याचं समर्थन पत्रसोबत घेऊ आले आहेत. हे पत्र राज्यपालांकडे दिलं जाणार आहे.
दोन्ही नेते राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सत्तास्थपानेचा आणि बहुमत असल्याचा दावा करणार आहेत. त्यानंतर आजच संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे.
सध्या एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आहेत. यावेळी फडणवीसांबरोबरच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदी भाजपाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.