आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परीक्षकपदी अमोल भगत यांची निवड
पुणे:
मलेशियाच्या येथे आय. एफ.एफ.एम या अंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परीक्षकपदी अमोल भगत यांची निवड करण्यात आली आहे.
या महोत्सवाच्या परीक्षकपदाचा भगत यांना बहुमान मिळाल्याने मराठी चित्रपसृष्टीटीला अभिमानाची गोष्ट आहे. चित्रपट दिग्दर्शन म्हणून त्यांनी ‘पुणे टू गोवा” या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शकाला मिळालेला हा बहुमान मराठी चित्रपट सृष्टीसाठी महत्वाची बाब आहे.
या चित्रपट महोत्सवात जगभरातून अनेक चित्रपट स्पर्धेसाठी सहभागी झाले असून यात अनेक दर्जेदार चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांचे परीक्षक म्हणून परीक्षण करणे हे मोठे आव्हान आहे. या संधीचे नक्कीच मी सोने करेन असे अमोल भगत यांनी सांगितले.