सातारा (महेश पवार) :
राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात असणाऱ्या श्री समर्थ बॅटरी या दुकानाला शनिवारी रात्री उशिरा आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही अग्निशमन दलाच्या वतीने पाऊण तासाच्या आटोक्यात आणण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी नितीन चव्हाण यांचे पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात श्री समर्थ बॅटरी नावाचे दुकान आहे ते रात्री उशिरा नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले असता काही वेळाने त्यांच्या दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले मात्र काही वेळातच आगीच्या ज्वालांनी दुकान वेढले गेल्याने परिसरात एकच धावपळ सुरू झाली काही सतर्क नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाल केंद्राला या आगीची कल्पना दिली अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचले अर्ध्या तासांमध्ये आग आटोक्यात आणण्यात आली.
मात्र तोपर्यंत आगीमध्ये बॅटऱ्या जळून तब्बल अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले या दुकानाचे मालक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन दुकानाची पाहणी केली असता बहुतांश दुकानातील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे सुदैवाने या आगीची झळ जवळच्या कोणत्याही दुकानांना बसली नाही.