जेमिनी ऑईलची महिलांसाठी ‘हि’ विशेष मोहिम
पणजी :
गृहिणींना सक्षम करण्याची गरज अधोरेखित करत जेमिनी ऑईलने ग्राहकांकडून मिळवलेल्या माहितीवर आधारित नवी जाहिरात आज सादर केली…
#AajKyaBannaChahtiHo. जेमिनीचे ग्राहक मागील काही वर्षांत सकारात्मक पद्धतीने बदलले आहेत ही जाणीव या जाहिरातीच्या संकल्पनेच्या मुळाशी आहे. आपल्या कुटुंबासाठी गरम, आरोग्यदायी आणि पोषक आहार बनवण्यासाठी वेळ देणारी पारंपरिक जेमिनी ग्राहक स्त्री आता प्रगतीशील स्त्री बनली आहे जी कुटुंबाच्या आरोग्य आणि हिताला प्राधान्य देतेच पण त्याचवेळी आपल्या स्वप्नांचा वेध घेण्याचा ध्यासही बाळगते. गृहिणींना त्यांच्या महत्त्वाकांक्षांचा वेध घेण्यासाठी वेळ आणि पाठबळ असावे, या मुद्द्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा उद्देश या जाहिरातीमागे आहे.
यंदा जेमिनी ब्रँडला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. ही नवी जाहिरात सादर करताना ब्रँडने आपल्या दैनंदिन वापराची तेलं, टेस्ट ऑइल आणि स्मार्ट हेल्थ (वेलनेस ऑइल) अशा सर्व उत्पादनांचे लोकप्रिय पॅकेज डिझाइन आणि लोगोमध्येही बदल केले आहेत. ब्रँडच्या ग्राहकांची बदलती मूल्ये विचारात घेत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पॅकेजिंग डिझाइन आणि लोगोमध्ये बदल करण्यात आले आहेत. उत्तम स्वयंपाकाच्या साह्याने कुटुंबाच्या आरोग्याची खातरजमा करणे आणि स्वत:चे छंद आणि आवडी जोपासण्यासाठी वेळ देणे यातील समतोल या नव्या डिझाइनमध्ये दिसून येतो.
या नव्या जाहिरातीच्या सादरीकरणाबद्दल भारतातील कारगिल ऑइल्स बिझनेसचे व्यवस्थापकीय संचालक पियुष पटनाइक म्हणाले, “जेमिनी हा आमचा मुख्य ब्रँड आहे. देशातील विविध भागांमध्ये हा भाग दमदारपणे आघाडीवर आहे. आमच्या सातत्याने उत्क्रांत होणाऱ्या ग्राहकांसोबत जोडले राहण्याचे आमचे प्रयत्न जेमिनी जाहिरातीतून खऱ्या अर्थाने प्रतित होत आहेत. ग्राहकांचा आमच्यावर दृढ विश्वास आहे. या विश्वासाला खरे उतरण्याचे प्रयत्न आम्ही यापुढेही करत राहू आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही त्यांना उत्तम पर्याय देऊ करू. आमच्या ग्राहकांच्या या आत्मशोधाच्या प्रवासात त्यांची साथ देण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि कुटुंबासोबतच स्वत:ला प्राधान्य देण्यात यापुढेही आम्ही त्यांचा हक्काचा ब्रँड बनून राहू.”
या नव्या जाहिरातीबद्दल भारतातील कारगिलच्या ऑइल्स व्यवसायाचे मार्केटिंग हेड सुबिन सिवन म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी त्यांच्या कुटुंबाचे हित हा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे त्यांची तत्वे आणि निवडी काळाच्या ओघात बदलल्या आहेत आणि नव्या स्वरुपातील पॅकेजिंग आणि लोगो तसेच नव्या जाहिरातीसह आम्हीही त्यांच्यासोबत उत्क्रांत होत आहोत. ‘आज क्या बना है’ (आज काय केलंय) हा प्रश्न जवळपास प्रत्येक स्त्रीला सामाजिक स्तरावर विचारला जातो. काळ बदलला असला तरी हा प्रश्न काही बदलला नाही. पण आता ‘आज क्या बना है’ ऐवजी ‘आज क्या बनना चाहती हो’ असा बदल करण्यास प्रत्येकाला प्रोत्साहन देत या पुढे जाऊ पाहणाऱ्या गृहिणींना पाठबळ देण्याचा उद्देश या जाहिरातीमागे आहे. या प्रगतीशील महिलांच्या उत्साहाला सलाम करण्याच्या आणि त्यांचे छंद, महत्त्वाकांक्षासाठी वेळ काढण्यास साह्य करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल ठरू शकते.”