‘सेक्स स्कँडल : मंत्र्याला पदावरून हटवा, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करा’
या मागणीचा मी आजही पुनरुच्चार करतो आणि या संदर्भात स्वतंत्र चौकशीची मागणी करतो. सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याचे किंवा पीडित महिलेचे नाव मी घेतले नसल्याचेही गिरीश चोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे अत्यंत दुर्दैवी आहे की राजकारण्याची चौकशी करुन त्यांचे नांव लोकासमोर आणण्याऐवजी, काही घटकांनी स्वताच्या फायद्यासाठी या मुद्द्याचा वापर केला आहे. मी कधीही नाव न घेतलेल्या आणि मी ओळखत नाही अशा महिलेला टॅग करून पोस्ट फॉरवर्ड केल्या आहेत, ज्या कृत्यांचे मी निषेध करतो. याची चौकशी होवूनच नंतर आरोपीचे नाव लोकांसमोर आले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
चोडणकर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महिलांचे लैंगिक शोषण असो किंवा अशा पोस्ट्सद्वारे त्यांची बदनामी करून छळ करणे, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि हे माझ्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. ज्यांनी तिचे फोटो वापरून महिलेची प्रतिष्ठा आणि आदर कमी केला आहे त्यांच्या या भूमिकेची मी चौकशीची मागणी करत आहे. या माध्यमातून सत्य जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया हे सत्य आणि न्याय जाणून घेण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे, परंतु आपण त्याचा उपयोग सत्याचा प्रसार करण्यासाठी केला पाहिजे आणि अफवा पसरवून कोणाचीही प्रतिष्ठा खराब करू नये.
माझ्या पोस्टचे उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे होते की ज्येष्ठ राजकारणी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत आणि महिलांचा गैरवापर करत आहेत. माझ्या पोस्टमध्ये कधीही कोणत्याही स्त्री-पुरुषाचे वैयक्तिक नाव नव्हते किंवा कोणताही फोटो पोस्ट केला गेला नाही किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करणारी टिप्पणी नव्हती. माझी पोस्ट ज्या पद्धतीने काही फोटोंसोबत जोडली गेली ती कोणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांना पोलिस खात्यामार्फत वस्तुस्थिती नक्कीच कळेल. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जाणून घेण्याची कळकळीची विनंती करतो.