चॅटजीपीटीला टक्कर द्यायला गुगलचे 1000 भाषा असलेले AI मॉडेल
ChatGpt: गुगलने जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 1000 भाषा बोलणारे युएसएम मॉडेल बनवणार असल्याची घोषणा गेल्या नोव्हेंबरमध्ये केली होती.
युएसएम अर्थात युनिव्हर्सल स्पीच मॉडलविषयी बोलताना कंपनीने म्हटले आहे की ही अशी प्रणाली आहे की जी कंपनीच्या अनेक ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी गुगलचे हे पहिले पाऊल आहे.
हे आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स आपले लक्ष्य गाठण्यासाठी आणि चॅटजीपीटीला मात देण्यासाठी 1000 भाषांवर काम करत आहे.
तज्ञांनी म्हटल्यानुसार, युएसएमला अत्याधुनिक भाषण मॉडेलचा एक घटक असल्याचे म्हटले आहे. गुगल( Google )ने दावा केला आहे की सध्या युएसएममध्ये 100हून अधिक भाषा आहेत.
भविष्यात युएसएम एका मोठ्या प्रणालीचा पाया म्हणून काम करेल असेही गुगलने म्हटले आहे. त्याचबरोबर, भविष्यात गुगल आपल्या प्रोडक्टसाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.