श्नायडर इलेक्ट्रिकची ‘इनोव्हेशन यात्रा’ गोव्यात…
ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशनच्या डिजिटल परिवर्तनातील जागतिक आघाडीवर असलेल्या श्नायडर इलेक्ट्रिकने ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या भारतातील ऑपरेशन्सच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त श्नायडर इलेक्ट्रिक इनोव्हेशन यात्रा सुरू केली. या यात्रेच्या केंद्रस्थानी कार्बन न्यूट्रल मोबाइल इनोव्हेशन हब ऑन व्हील्स आहे.
त्यामध्ये श्नायडर इलेक्ट्रिकचे loT-सक्षम उपाय, कनेक्टेड उत्पादन योजना, कंपनीची भारतातील वाटचाल आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान देणारी तिची भूमिका ही वैशिष्ट्ये आहेत. अलीकडेच उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक शहरांनंतर मोबाईल इनोव्हेशन हब गोव्यात पोहोचले. या यात्रेने गोव्यातील २०० हून अधिक ग्राहक, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, चॅनल भागीदार आणि प्रभावशाली लोकांना आकर्षित केले.
ही कार्बन न्यूट्रल यात्रा ६ महिन्यांत भारतातील ६० हून अधिक शहरांमध्ये प्रवास करेल. श्नायडर इलेक्ट्रिकचा देशातील ६० वर्षांचा प्रवास आणि ऊर्जा व्यवस्थापन आणि नेक्स्टजेन ऑटोमेशन क्षेत्रामध्ये IoT, इलेक्ट्रिसिटी 4.0, डिजिटायझेशन आणि शाश्वतता यामधील प्रगतीबद्दल ज्ञान देऊन राष्ट्र उभारणीला पाठिंबा देण्याच्या सातत्यपूर्ण बांधिलकीवर प्रकाश टाकणे हा तिचा उद्देश आहे. २० दशलक्षाहून अधिक नागरिक, कॉर्पोरेट्स, उद्योग तज्ञ, धोरणकर्ते, भागीदार, ग्राहक, शेतकरी, इलेक्ट्रिशियन, संस्था, सरकार आणि इतर यांच्याशी जोडून शाश्वतता आणि डिजिटायझेशनचा संदेश पसरवण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यावरण पूरक मोबाइल हब पुनर्वापर करण्यायोग्य साहित्य आणि अक्षय उर्जेद्वारे सक्षम असून त्यामध्ये ल्युमिनियस सोलार पॅनल्स आणि IOT सक्षम उपाय, कनेक्टेड उत्पादन योजना, भारतातील समूहाचा प्रवास, भारताच्या वाढीसाठी योगदान आणि वचनबद्धता आणि विशेष ‘ग्रीन योधा’ शाश्वतता क्षेत्र दर्शविते.
या उपक्रमाविषयी बोलताना श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे ग्रेटर इंडिया झोन प्रेसिडेंट आणि एमडी आणि सीईओ दीपक शर्मा म्हणाले, “आमचे भारतातील ६० वर्षांचे स्थान देशाच्या प्रगतीसाठी असलेल्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीची पावती आहे. श्नाइडर इलेक्ट्रिककडे आता ३७,००० हून अधिक कर्मचारी आहेत, भारतात ३० उत्पादन केंद्र आहेत. त्यायोगे कंपनी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आणि समूहासाठी ४ जागतिक केंद्रांपैकी एक बनली आहे. श्नाइडर इलेक्ट्रिक इनोव्हेशन यात्रा हे आमच्या भागधारकांशी जोडले जाण्यासाठी आणि संलग्न होण्यासाठी, आमच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि शाश्वत नवकल्पना आणि डिजिटायझेशनला चालना देत आमच्या बांधिलकीचे प्रदर्शन करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ आहे. आमचा विश्वास आहे की, अमृत कालच्या काळात लवचिक आणि शाश्वत भारत घडवण्याचा दृष्टीकोन, सहयोगी कृतींद्वारे साध्य केला जाऊ शकतो. आमच्या ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण विश्वास आणि पाठबळासाठी मी मनापासून ऋणी आहे.”
जबाबदार मार्केटिंगवर असलेले कंपनीचे लक्ष अधोरेखित करत श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे ग्लोबल मार्केटिंग उपाध्यक्ष, मुख्य विपणन अधिकारी रजत अब्बी म्हणाले, “श्नाइडर इलेक्ट्रिकद्वारे सादर केले जात असलेले शाश्वत, डिजिटल आणि नेक्स्ट जेन ऑटोमेशन सोल्यूशन्स यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही कार्बन न्यूट्रल यात्रा संपूर्ण देशभर फिरेल. ही अनोखी मोहीम आमच्या प्रमुख ग्रीन योधा उपक्रमाचा विस्तार असून तिचे उद्दिष्ट व्यापक आणि वैविध्यपूर्ण ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि हवामान बदलाविरूद्धच्या चांगल्या लढ्यात अधिकाधिक भागधारकांना सामील करून घेणे आहे. आमच्या मार्केटिंग प्लेबुकमध्ये 4P आहेत उद्देश, भागीदारी, वसुंधरा आणि कामगिरी (परपज, पार्टनरशीप, प्लॅनेट आणि परफॉर्मन्स) आणि या उपक्रमात डिजिटल, प्रत्यक्ष, सामाजिक आणि सर्व-चॅनेलच्या माध्यमातून लाखो भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे साधन असेल.”