google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

आता फोटोंवरील मजकूराचेही करता येणार भाषांतर


Google Translate ही गुगलची सेवा जगभरामध्ये वापरली जाते. यामध्ये १२० पेक्षा जास्त भाषांचा समावेश आहे. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू अशा काही भारतीय भाषादेखील गुगल ट्रान्सलेटमध्ये आहेत. एखाद्या भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरीत करण्यासाठी गुगलच्या या टूलचा वापर केला जातो. परदेशातील लोकांशी संवाद साधताना, एखादी अनोळखी भाषा शिकताना गुगल ट्रान्सलेटची खूप मदत होते. एप्रिल २००६ मध्ये गुगलद्वारे ही सेवा लॉन्च करण्यात आली होती. या सेवेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

गुगल ट्रान्सलेटमध्ये नुकतेच अपडेट करण्यात आले आहे. या नव्या अपडेट्समुळे वापरकर्त्यांना फोटोच्या माध्यमातूनही भाषांतर करणे शक्य होणार आहे. सोप्या शब्दात, गुगल ट्रान्सलेट आता फोटो स्कॅन करुन त्यावर लिहिलेला मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करु शकणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा नवा अपडेट करण्यात आला आहे.

फोटोवरील मजकूर भाषांतरित करण्यासाठी सर्वप्रथम वेबवर Google Translate ची वेबसाइटवर जावे. होमपेजवर गुगल ट्रान्सलेट या नावाच्या खाली टेक्स असे लिहिलेले दिसेल. त्याच्या बाजूला Image, Documents असे काही पर्याय दिसतील. त्यातील इमेज टॅबवर क्लिक केल्यावर jpg, jpeg किंवा png फॉरमॅटमध्ये मजकूर असलेली फोटोची फाईल अपलोड करावी. पुढे त्यामध्ये असलेले टूल फोटो स्कॅन करुन त्यातील भाषा कोणती हे शोधून काढेल आणि डीफॉल्ट म्हणून सेट केलेल्या भाषेमध्ये मजकूर भाषांतरित होईल. हा मजकूर कॉपी करता येतो, तसेच भाषांतरित मजकूराचा फोटो डाऊनलोड करता येतो.

या व्यतिरिक्त भाषांतर केल्यानंतर दोन्ही मजकूरांमधील तुलना पाहण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. यासाठी वरच्या बाजूला असलेल्या Show original toggle या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या टूलच्या खालच्या बाजूला History असे लिहिलेले दिसते. यामध्ये भाषांतर केलेला मजकूर जतन केला असतो असे म्हटले जात आहे. आउटपुटखाली असलेल्या ‘Lens translate’ वरुन गुगल ट्रान्सलेटमधला हा नवा अपडेट गुगल लेन्ससाठी वापरण्यात येणाऱ्या GAN (generative adversarial networks) चा वापर करत असल्याचे समजते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!