google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

“गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे”

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिना होत आला आहे. या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आकडेवारीनुसार, एकूण 1400 इस्रायली आणि 10 हजाराहून अधिक पॅलेस्टिनी मरण पावले आहेत. गाझा पट्टीमध्ये मरण पावलेल्या मुलांची आणि महिलांची संख्या खूप जास्त आहे.

या हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांना सांगितलं की, गाझामधील दुःस्वप्न हे मानवतावादी संकटापेक्षा जास्त आहे. हे मानवतेचं संकट आहे. ते पुढं म्हणाले की, प्रत्येक तासागणिक युद्धविरामाची गरज अधिक तीव्र होत आहे. संघर्षातील पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हा अमानवी सामूहिक त्रास थांबवण्याची आणि गाझाला मानवतावादी मदतीचा नाट्यमयपणे विस्तार करण्याची त्वरित आणि मूलभूत जबाबदारी आहे.

ते म्हणाले की, गाझामध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे स्पष्टपणे उल्लंघन केले जात आहे. गाझा आणि वेस्ट बँकमधील 2.7 दशलक्ष लोकांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना 1.2 अब्ज डॉलरची गरज आहे. अहवालानुसार, युद्धामुळे सध्या 238 लोक हमासच्या ताब्यात आहेत. युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर म्हणाले की, गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या दहा लाखांहून अधिक मुलांनाही शुद्ध पाण्याचा अभाव आहे. डिहायड्रेशनमुळे मुलांचा, विशेषत: लहान मुलांचा मृत्यू हा वाढता धोका बनला आहे.

israel-hamas-war-gaza-becoming-a-graveyard-for-children-says-un-secretary
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आज जवळपास एक महिन्यांचा कालावधी पूर्ण झालाय. या युद्धात आतापर्यंत 12 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली होती. त्यानंतर या प्रत्यूत्तर देत हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं. मागील एका महिन्यापासून हा संघर्ष सुरुच असून युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही. इस्रायल आणि हमास युद्धात 10 हजारांहून अधिक पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयानं दिलीय. इस्रायलकडून हमासला लक्ष्य करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्यानं हल्ले सुरु आहेत. यामुळं गाझातील नागरिकांची अवस्था फार बिकट झाली असून गाझातील नागरिकांना अन्न-पाणी मिळणंही कठीण झालंय.

इस्रायल आणि हमासच्या संघर्षात आतापर्यंत 12 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या माहितीनुसार इस्रायल आणि हमास युद्धात 10 हजार 22 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे यापैकी 4104 मुलं आहेत. याशिवाय अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान, या युद्धात सुमारे 2000 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

इस्रायलच्या गाझावरील हल्ल्याच्या विरोधात जगभर निदर्शनं होत आहेत तसंच हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण युद्धविराम होण्याची शक्यता दिसत नाही. हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलनं आता गाझा पट्टीत जमिनीवर हल्ले करणेही सुरू केले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!