‘असे’ करण्यात आले जेजुरीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत
पुणे (अभयकुमार देशमुख) :
पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मध्ये दाखल झाला. जेजुरीमध्ये आल्यानंतर जेजुरीकरांनी भंडार खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.
26 जून सकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड होऊन जेजुरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला होता. यानंतर वाटेतील तीन ठिकाणचे विसावे झाल्यानंतर हा सोहळा सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान जेजुरी येथे दाखल झाला.
यावर्षीपासून संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी होळकर तलावाच्या बाजूला नवीन पालखीतळ तयार केल्याने यावर्षी पहिल्यांदाच हा पालखी सोहळा तिथे विसरणार आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार आणि माऊली माऊली अशा गजरांमध्ये जेजुरीकरांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले . संत ज्ञानेश्वरांच्या आगमनाने संपूर्ण जेजुरी परिसर वैष्णवमय झाला आहे.
नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्याचे स्वागत केले उद्या सकाळी हा सोहळा वाल्मीक उंची नग्री असलेल्या वाढले नगरीत मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे