
डिजिटल युगात गोव्यातील व्यवसाय वाढण्यास जस्टडायलची मदत
सुंदर समुद्रकिनारे, उत्साही संस्कृती आणि समृद्ध वारसा यासाठी ओळखले जाणारे गोवा हे पर्यटन, उत्पादन आणि खाणकाम या व्यवसायांसाठी देखील ओळखले जाते. यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. अंदाजे 68,000 Udyam-नोंदणीकृत MSMEs सह, राज्यातील भरभराटीचे लघू आणि मध्यम व्यवसाय क्षेत्र आहे. गोव्यात डिजिटल परिवर्तन होत असताना, जस्टडायल व्यवसायांना सक्षम बनवण्यात, त्यांची माहिती पोहोचवण्यात आणि त्यांना खऱ्या ग्राहकांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
गोव्यातील व्यवसायांची दृश्यमानता वाढवण्यासाठी, त्याची माहिती देण्यासाठी आणि गुंतवणुकीवर मोजता येण्याजोगा परतावा मिळवण्यासाठी जस्टडायल डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करते. उद्योगांमधील उद्योजकांनी फक्त त्यांचा स्थानिक ग्राहक वाढवण्यासाठीच नव्हे तर गोव्याच्या पलीकडे जात नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी जस्टडायलचा फायदा घेतला आहे.
साई एंटरप्रायझेसमधील ओमप्रकाश यादव पाच वर्षांपासून जस्टडायल वापरत आहेत आणि ग्राहकांमध्ये सातत्याने वाढ अनुभवत आहेत. “जस्टडायल माझ्या व्यवसायासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. व्यवसाय सुरू केल्यापासून मला दररोज किमान 5-7 संभाव्य ग्राहकांकडून विचारणा झाली आहे. माझ्या गुंतवणुकीवरील परतावा प्रभावशाली आहे, आणि माझा विश्वास आहे की व्यवसाय वाढण्यासाठी जस्टडायल हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे,” असेही त्याने सांगितले.
जस्टडायलच्या प्लॅटफॉर्मसह, दररोज नवीन ग्राहकांपर्यंत व्यवसाय पोहोचवण्यास सक्षम आहेत, चौकशीचा स्थिर प्रवाह आणि वाढीव महसूल ते निश्चित करतात.
डॉ. सोनाली सरनोबत, होमिओपॅथिक फिजिशियन आणि सल्लागार यांची ओळख गोव्याच्या पलीकडे वाढवण्यात जस्टडायलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या म्हणतात, “जस्टडायलचे आभार, आता दक्षिण कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात मी भक्कमपणे पाय रोवले आहेत. या प्लॅटफॉर्मने आम्हाला आमच्या सेवा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली आहे आणि जस्टडायल टीमने आमची ऑनलाइन उपस्थिती प्रभावीपणे कशी वाढवायची याबद्दल मला मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
जस्ट डायलने व्यावसायिकांना त्यांचा विस्तार करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या सेवा डिजिटल दृश्यमानतेसह अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेशयोग्य बनल्या आहेत. दंत चिकित्सालय आणि उपकरणे वितरणात अग्रेसर असलेल्या गोवा डेंटल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसचे नोएल लॉरेन्स लोबो यांनाही जस्टडायलच्या सेवांचा फायदा झाला आहे. “आम्ही 2016 पासून जस्टडायलशी जोडलेले आहोत, आणि सिंधुदुर्ग तसेच कारवारमध्ये विस्तार करताना आम्हाला याची खूप मदत झाली. आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी जस्टडायलने दिलेल्या पाठबळाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” असे ते म्हणाले.
जस्टडायलच्या सेवांचा लाभ घेतल्याने, व्यवसायांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यामुळे त्यांची बाजारातील उपस्थिती आणि ग्राहक संबंध मजबूत होत आहेत.
त्याचप्रमाणे दक्षिण गोव्यातील श्री महावीर एक्स्प्रेसमधील भुवा रविकुमार यांच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे. ते म्हणतात, “माझ्याकडे जस्ट डायलचे टॉप लिस्टिंग पॅकेज आहे. त्यामुळे मला उच्च–गुणवत्तेच्या चौकशी आणि लीड्स मिळतात. जस्ट डायलची टीम अत्यंत मदत करणारी आहे. आणि आमच्या उत्तम नातेसंबंधामुळे माझ्या व्यवसायात मोठा फरक पडला आहे.”
एंटरप्राइझेसनी त्यांचा विस्तार करण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स स्वीकारल्याने गोव्याचा व्यावसायिक लँडस्केप विकसित होत आहे. ग्राहकांच्या बदलत्या वर्तनाशी जुळवून घेत असताना, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण व्यवसायांना योग्य ग्राहकांशी जोडण्यात, त्यांची दृश्यमानता वाढवण्यात आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.