कास परिसराचे अवैध प्लॉटिंगमुळे तुकडे?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर कास पठार व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे यांना महत्त्व निर्माण झाले, यामुळे देश विदेशातील पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने येऊ लागल्याने पठाराचे महत्व वाढू लागले , याचं संधीचा फायदा घेऊन काही स्थानिक एजंटांनी इथल्या जमिनी कवडीमोल भावाने विकून बिल्डरांच्या घशात घालून कास पठार परिसरात बेकायदेशीर प्लॉटिंग करून अक्षरशः कास पठार परिसरातील जमिनीचे अक्षरशः तुकडे केल्याचे चित्र पाहायला मिळते परंतु हे सर्व जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात देखत होत असताना देखील जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याचं धारिष्ट्य दाखवले नाही यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मध्ये अवैद्य बांधकाम धारकांना जिल्हा प्रशासनाची साथ आहे का काय? अशी चर्चा सुरू आहे .
त्याचबरोबर कास पठार परिसरात सुरू असलेल्या प्लॉटिंगसाठी परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत , असताना देखील याकडे गांभीर्याने घेत नसल्याने कास पुष्प पठार परिसरातील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असून यामुळे हेरिटेज असलेले कास पठार हे अवैध बांधकाम , अवैध वृक्षतोड आणि बेकायदेशीर प्लॉटिंग च्या तुकड्यांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असताना देखील जिल्हा प्रशासनातील अधिकारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने या सुरू असलेल्या प्रकाराला जिल्हा प्रशासनाची साथ आहे की काय अशी सातारकर मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे