महाराष्ट्रसातारा
परळीत बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला…
सातारा (महेश पवार):
तालुक्यातील परळी खोर्यातील अंबवडे बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी नोकरी नसल्याने शेळी पालन व्यवसाय सुरू केले मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
बिबट्या आता घरापर्यंत पोहचला असून शिवारात शेळ्या चारायलायला घेऊन जायला देखील शेतकरी घाबरु लागले आहेत. एकीकडे पाऊस नसल्याने शेती धोक्यात आणी दुसरीकडे शेतकऱ्यांनी सुरू केलेला पशुपालन व्यवसाय देखील जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे धोक्यात आला आहे. यामुळे वन विभागाने तातडीने लक्ष घालून उपययोजना करावी अशी मागणी आता शेतकरीवर्गातून होऊ लागली आहे.