
संजय राऊत यांनी महायुतीबद्दल कितीही खडे टाकले, तरी… : चंद्रशेखर बावनकुळे
सातारा (महेश पवार):
सातारा जिल्ह्यातील कराड तालुका दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भगवा फडकवणार असे वक्तव्य केले यावर अजित पवार यांनी देखील पुण्यात झेंडा आम्ही फडकवणार असं वक्तव्य केल्याने महायुती मध्ये नेमकं काय सुरू आहे असे विचारले असता बावनकुळे म्हणाले महायुती प्रचंड मजबूत आहे,जो तो आपपले पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहे आमचं सगळं आलबेल आहे असं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर काढणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केला नाही आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे . संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडावी , चांगल्या भूमिका सांगाव्यात महाराष्ट्रातील जनता आता संजय राऊत यांना ऐकत नाही , आम्ही पण ऐकत नाही हे सरकार प्रचंड ताकतीने चालणार आहे यामुळे संजय राऊतांनी कितीही खडे टाकले तरी महायुती तुटणार नाही असं म्हणत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला.