सातारा
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठेकेदाराची भाईगिरी
सातारा :
जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग हे बैठकीसाठी आले असताना याठिकाणी सातारा जिल्ह्यातील अन्न पुरवठा ठेकेदार फिरोज पठाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना, मला इथं येऊन शिकवायचे नाही लय शायनिंग करायची नाही म्हणत अरेरावीची भाषा फिरोज पठाण ने केल्यानं . याठिकाणी असणारे अधिकारी आणि नागरिक यांच्या त फिरोज पठाणच्या भाईगिरी ची जोरदार चर्चा होती . यासंबंधी आशुतोष सिंग यांना पत्रकारांनी विचारले असता घाबरले सिंग यांनी बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले.