google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

समीर शेख साताऱ्याचे नवे एस. पी.

गडचिरोली येथून थेट साताऱ्यात बदली

सातारा ( प्रतिनिधी) :

गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे तत्कालीन एसपी अजय कुमार बंसल अजूनही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत

गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले होते यामध्ये अजय कुमार बंसल यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली असून गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक यांना साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रात्री उशिरा पोलीस मुख्यालयांमध्ये या बदलीचे आदेश प्राप्त झाले अजय कुमार बंसल यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केले होते . तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली त्यांच्याच कार्य काळामध्ये dpdcतून तब्बल 105 वाहनांसाठी पोलिसांना निधी मिळाला आणि ती वाहने तपास कामासाठी पोलिसांना उपलब्ध झाली.

महिला सुरक्षा प्रदर्शित प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याचे हस्ते झालेले उद्घाटन चर्चेचा विषय ठरले हा प्रकल्प सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजला गेला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा पोलिसांनी 75 किलोमीटरची धाव घेतली यामध्ये सुद्धा बंसल यांचे मोठे नियोजन होते बंसल यांनी 56 57 च्या प्रस्तावद्वारे 91 जणांना तडीपार केले बंसल यांच्या कार्यकाळात एलसीबीने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई केली 18 खुणाचे गुन्हे उघडगी जाणून 54 आरोपींना अटक केली नऊ दरोड्याची प्रकरणे यशस्वीरित्या तपासून यामध्ये 46 रुपये अटक करण्यात आली जबरी चोरीच्या दहा प्रकरणात पोलिसांनी 13 जणांना अटक केली . तर गुन्ह्याच्या विविध 145 प्रकारांमध्ये 263 आरोपींना अटक करण्यात आली तसेच मुद्देमाल जप्तीची अडीच कोटी रुपयांची प्रकरणे सातारा पोलिसांनी बंसल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरिता हाताळली

रात्री उशिरा बन्सल यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले मात्र सध्या त्यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली आहे गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे समीर शेख यांनी साताऱ्यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता साधारण 17 महिने त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्य ग्रंथालय तयार करून आपल्यातील अनोख्या कार्यशैलीचा परिचय करून दिला होता शाहूपुरी सातारा शहर येथील मटका आणि जुगार अड्ड्यांवर दणकट कारवाया करत गुन्हेगारांमध्ये समीर शेख यांनी चांगली दहशत निर्माण केली याशिवाय पंढरपूरच्या पालखी बंदोबस्ताचा नियोजन सोहळा असो अथवा शहरात सह जिल्ह्यातले कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन असो समीर शेख हे कायमच अग्रभागी राहिले. सुरूची राडा प्रकरणाचा धडक तपास समीर शेख यांनी केला शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला होता .गडचिरोली वरून अजय कुमार बंसल यांची साताऱ्यात बदली झाली होती त्याच पद्धतीने गडचिरोली वरून पुन्हा समीर शेख हे साताऱ्यात एस पी म्हणून आता लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत ते कामावर हजर कधी होणार याची जिल्हा पोलिसांना प्रचंड उत्सुकता आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!