google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; २४ तासांत ६ हत्या…

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आलं असून लष्करी जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या एका बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतलं आहे.

सुरक्षा दलातील सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, या भागात काल सायंकाळी झालेल्या हत्यांपैकी दोन जणांना खूप जवळून गोळ्या घातल्या आहेत. तसेच त्यांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी आज (६ ऑगस्ट) इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचं सांगितं जात आहे.

बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शनिवारी (५ ऑगस्ट) अनेक ठिकाणी मोर्टार आणि ग्रेनेड हल्ले झाले. तसेच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. गेल्या दोन आठवड्यांपैकी कालच्या दिवशी इम्फाळसह बिष्णुपूर-चुराचांदपूरमधली परिस्थिती खून नाजूक होती.

शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागातील एका गावात पिता-पुत्रासह तीन ग्रामस्थांची हत्या करण्यात आली आहे. खरंतर ३ मेपासून या भागातली परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या गावांमधील लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं होतं. परंतु, या गावातील काही लोक शुक्रवारी त्यांच्या घरी परतले होते. गावकरी गावात परतल्यानंतर काहीच तासांत त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात एकाच गावातील पाच जणांचा बळी गेला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!