पणजी:
यंदाची 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे where is Moga? (मोगा कुठे आहे?)
सोशल मीडिया, व्हिडिओ या माध्यमातुन लहान मुले, खेळाडू, सेलिब्रिटी, राजकीय नेते, अगदी मुख्यमंत्री देखील सतत हेच सांगत होते की मोगा (Moga) हरवला आहे. त्याला शोधले पाहिजे. पण मोगा आहे कुठे? हाच प्रश्न गेले काही दिवस सतत कानावर येत होता.
त्यामुळे मोगा बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रविवारी या प्रश्नांचे उत्तर गोवेकरांना मिळाले.
Mascot Launch Ceremony of the 37th National Games Goa 2023 https://t.co/yTZl2OHtL7
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) June 18, 2023
गोवा क्रांती दिनाचे निम्मित साधून शेकडो गोवेकरांच्या उपस्थितीत मोगा गोवेकरांच्या समोर अवतरला. रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या जल्लोषात या स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण करण्यात आले. इंडियन बायसन तथा गवा हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. हा गोव्याचा राज्य प्राणी देखील आहे.
कार्यक्रमाची सुरवात स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी गेट सेट गोवा हे रॅप सॉन्ग देखील सादर करण्यात आले.