google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

विकासाची रुजुवात करणारा अर्थसंकल्प

पणजी:

ग्रामीण गोव्‍याला प्राधान्‍य देत रोजगाराच्‍या संधींना वाव देणारा 2023-24 सालचा 26,794 कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्‍प मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला.

गत वर्षीच्‍या तुलनेत 9.71 टक्‍के वाढ असून 669 कोटी शिलकीचे हे बजेट आहे. त्‍यात महसुली वाटा 19,768 कोटी आणि भांडवली वाटा 7075 कोटी आहे. आभासी योजनांना फाटा देत, सर्वसामान्‍यांना अधिकाधिक प्रवाहात आणण्‍याचे लक्ष्‍य बाळगण्‍यात आले आहे.

आरोग्‍य क्षेत्रासाठी 18 टक्‍क्‍यांनी तरतूद वाढवून ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावानुसार मुख्‍यमंत्र्यांनी वाटचालीचे ध्‍येय बाळगले आहे. जनतेवर कोणताही वाढीव कर लादलेला नाही.

लक्षवेधी घोषणा:

म्‍हादई खोऱ्यात उभारणार नवे तीन अद्ययावत प्रकल्‍प

सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरी

सरपंच, उपसरपंच, पंचांच्‍या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ

सरकारी कार्यालयांतील कॅन्‍टिनचा ठेका बचतगटांना

पाच वर्षांत 5 हजार हरित नोकऱ्यांचे उद्दिष्‍ट

स्‍वयंपूर्ण’ योजनेला बळकटी देण्‍यासाठी स्‍वयंपूर्ण गोवा बोर्डची स्‍थापना; त्‍यासाठी अडीच कोटींची तरतूद

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्‍यमंत्री सरल पगार योजना; महिना पूर्ण होण्‍याआधीही मिळू शकतील पैसे.

विविध तक्रारींसाठी 24/7 खास पोर्टल सुरू करणार; कामचुकार कर्मचाऱ्यांना सक्‍तीची निवृत्ती.

वाहतूक खात्‍यासाठी 296.75 कोटींची तरतूद; मुख्‍यमंत्री सारथी योजना ‘कदंब’तर्फे राबवणार

मुख्‍यमंत्री गोंयकार टॅक्‍सी पात्रांव योजनेंतर्गत आणखी 1 हजार युवकांना टॅक्‍सी देणार

राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धांसाठी 225 कोटींची तरतूद; गोवा राज्‍य युवा आयोगही स्‍थापन करणार

अग्‍निवीर योजनेत चार वर्षे पूर्ण करणाऱ्यांना सरकारच्‍या काही खात्‍यांत 10 टक्‍के आरक्षण

महागड्या दारूवरील अबकारी करात घट, इतर प्रकारच्‍या दारूवरील करात मात्र होणार वाढ

सरकारी राजपत्र कोकणी भाषेतून प्रसिद्ध करणार, यंदा राज्‍यात विश्‍‍व कोकणी संमेलनाचे आयोजन

उत्‍कृष्‍ट कामगिरी शिक्षकांसाठी मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार योजना

राज्‍यात दिव्‍यांगांसाठी नवे खाते तयार करणार; मुख्‍यमंत्री देवदर्शन योजनेसाठी १० कोटी

प्रधानमंत्री कुसूम योजना : मच्‍छीमार, शेतकऱ्यांना लाभ मिळणार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!