महाराष्ट्रात राजकिय भूकंप ; एकनाथ शिंदे ‘not reachable’
मुंबई:
राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे तब्बल 35 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
यामध्ये मराठवाडा
- सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
- पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
- औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
- कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
- वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
- नांदेडचे बालाजी कल्याणकर
कोकण
- अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
- कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
- महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र
- आटपाडीचे आमदार अनिल बाबर
- भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
- पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
- सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
- साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
ठाणे
- अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
- पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
- भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
- कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
उत्तर महाराष्ट्र
- पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
विदर्भ
- मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
- बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.