पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या माता हिराबेन यांचं 100 व्या वर्षी निधन झालं आहे. निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी तातडीने अहमदाबादला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विट करत हिराबेन यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. यानंतर त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये हीराबेन यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले आहे. कफाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थंडीच्या मोसमात कफ येण्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. हा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या.
हिराबा यांनी 18 जून 2022 रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आई हीराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते.