Rajyasabha : लोकसभेनंतर राज्यसभेतील ४५ खासदारांचं निलंबन…
Rajyasabha:
राज्यसभेत खासदारांनी संसद सुरक्षेच्या मुद्द्यावर गोंधळ घातला. तेव्हा, सभापती जगदीप धनकड यांनी राज्यसभेच्या (Rajyasabha) ४५ खासदारांना निलंबित केलं आहे. ३४ खासदारांना हिवाळी अधिवेनाच्या उर्वरित कालावधीसाठी तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत ११ खासदारांना निलंबित केलं आहे. समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.
45 opposition MPs suspended from Rajya Sabha for 'misconduct'
Read @ANI Story | https://t.co/pkGrDdQtKz#RajyaSabha #WinterSession2023 #ParliamentWinterSession pic.twitter.com/a9iEMpO6NC
— ANI Digital (@ani_digital) December 18, 2023
निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सभापतींनी खासदारांना परिसर सभागृहत सोडण्यास सांगितलं. पण, खासदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे नेते के. सी वेणुगोपाल, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला यांच्यासह विरोधी पक्षातील ४५ सदस्यांचा समावेश आहे.