अर्थमत/ टेक्नॉलॉजी

एनडीआर इनव्हिटकडून गोव्यात 2.35 लाख चौरस फूट सुविधेचे उद्घाटन

पणजी: राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेला भारतातील पहिलाच कायमस्वरूपी गोदाम आणि इंडस्ट्रिअल इस्टेट (Perpetual Warehousing and Industrial Parks) InvIT ट्रस्ट – NDR InvIT ट्रस्टने वेर्ना विमानतळ रस्त्यावरील NDR वरामा सर येथे 2.35 लाख चौरस फुटांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. तसेच ही इमारत ती दोन ग्राहकांकडे सुपूर्द केली.


एका आघाडीच्या क्विक कॉमर्स कंपनीसाठी ~1.06 लाख चौरस फूट आणि FMCD उत्पादने हाताळणाऱ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (3पीएल) कंपनीसाठी ~1.24 लाख चौरस फूट जागा अशी या जागेची रचना करण्यात आली आहे.


या कार्यक्रमाला एन. अमृतेश रेड्डी (संचालक, NDR InvIT ट्रस्ट), जगदीश भानुशाली, मीत भानुशाली आणि सुंदर राजन असे मान्यवर उपस्थित होते. भारतातील लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या ट्रस्टच्या प्रयत्नांमध्ये ही इमारत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.


या नवीन टप्प्यासह NDR InvIT गोव्यात आपले स्थान अधिक भक्कम करते आहे. येथून ते सर्वात मोठ्या वेअरहाऊसिंग आणि औद्योगिक पार्कचा पोर्टफोलिओ चालवतात. वेर्ना औद्योगिक क्षेत्रातील NDR गोवास्पेस प्रायव्हेट लिमिटेड आणि वेर्ना विमानतळ रोडवरील NDR वरमा सर या सुमारे 11 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या त्यांच्या दोन प्रमुख औद्योगिक प्रकल्पांमधून हा पोर्टफोलिओ चालवला जातो. एकत्रितपणे, या मालमत्ता या भागातील उच्च-व्हॉल्यूम, हाय-स्पीड लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक ऑपरेशन्ससाठी महत्त्वपूर्ण घटक म्हणून काम करतात.


प्रकल्प संचालक जगदीश भानुशाली म्हणाले: “आधुनिक व्यापार, उत्पादन तसेच वाणिज्य यांच्या गरजा वेगाने पूर्ण करणाऱ्या भविष्यासाठी तयार पायाभूत सुविधांप्रती आमची वचनबद्धता या माध्यमातून सिद्ध होते आहे. शेवटच्या घटकाच्या कार्यक्षमतेपासून ते संपूर्ण देशभरातील विस्तरापर्यंत, NDR InvIT ची मालमत्ता वेग, शाश्वतता आणि स्केलेबिलिटीला समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. गोवा पोर्टफोलिओ हा सौम्य उत्पादन, जलद व्यापार, तृतीय पक्ष लॉजिस्टिक्सपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंपर्यंतच्या उद्योगांसाठी सक्षम आहे आणि ही नवीन भर आमच्या ग्राहकांना उच्च-क्षमतेच्या बाजारपेठेत विस्ताराची संधी देते.”


एनडीआरचा गोवा पोर्टफोलिओ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यात असून प्रादेशिक तसेच देशव्यापी वितरण गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लक्षात येईल असा ठसा, सक्षम वितरण, भरपूर डॉक्स आणि मूल्यवर्धित सेवा उपलब्ध होत असल्याने वेळ वाचतोच पण दर्जेदार सेवा मिळते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!