google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी’

कराड (अभयकुमार देशमुख ) :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष शंभूराज रैनाक, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष काकासाहेब जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र माने, निता लोंढे, मोनिका गोरे, गुलाबराव पाटील, प्रमोद वर्णेकर, गणेश भोसले, महेश पाटील, दिलीप पाटील, रोहीत पंडित आदी उपस्थित होते. सदरचा निधी प्रामुख्याने शिवाजी हाऊसिंग सोसायटी, प्रकाशनगर, रुक्मिणी इस्टेट, कृष्णांगण सोसायटी, पाटील नगर, राजाराम नगर व वाढीव भागातील प्रभाग दोनसाठी मंजूर झाला असून लगतच्या काही प्रभागांनाही निधी मंजूर झाला आहे.

मंजूर झालेला निधीत पुढील विकासकामांचा समावेश :
वैशिष्टय़पूर्ण योजनेनुसार लिबर्टी मजदूर मंडळ कराड येथे इनडोअर कबड्डी स्टेडीयम विकसित करणे 1 कोटी 45 लाख, लिबर्टी मंडळाचे ग्राऊंड, बाल्कनी व जिम्नॅशियम विकसित करणे 1 कोटी 10 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील पवार नगरमधील राजाराम पार्क ते डी. जी. पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील एलआयसी ऑफिस ते विरंगुळा बंगला रस्ता बीएम, बीसी करणे 40 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड 47 नं. डांबाच्या पश्चिमेस हणमंतराव कदम ते गुरुप्रसाद धाबा ते मोहन पाटील वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 95 लाख, शहरातील प्रमुख रस्त्यावर आईज कॅट बसवणे, थर्मोप्लास्टीक पेंट मारणे 50 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाशनगर रोड ते रुक्मिणी इस्टेट ते कृष्णांगण सोसायटी व पाटील नगर, राजाराम नगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सोलर एलईडी पथदिवे बसवणे 90 लाख, प्रभाग 2 मधील कॉटेज हॉस्पिटल ते प्रकाशनगर बिल्डिंग कॉर्नरपर्यंत पूर्व पश्चिम रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 45 लाख, प्रभाग 2 मधील डॉ. महेश पाटील यांच्या घरापासून कृष्णांगण सोसायटीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 31 लाख, प्रभाग 2 मधील जीवन रेखा पतसंस्थेपासून कलबुर्गी घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख.

कामगार चौक ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 85 लाख, प्रभाग 2 मधील कृष्णांगण सोसायटी मधील वीतराग अपार्टमेंटपासून सतीश चव्हाण घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लाख, प्रभाग 2 मधील सर्वे नं. 69/1 येथील मुळे, गुरसाळे, ओसवाल, शाह बंधू येथील ओपन स्पेसमध्ये गार्डन व ओपन जिम विकसित करणे व प्रभाग 2 मधील वाढीव भाग रुक्मिणी इस्टेटमधील ओपन स्पेसमधील गार्डन विकसित करणे 10 लाख, 2 मधील डॉ. काझी ते राम मंदिर पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 25 लाख, प्रभाग 2 मधील विठामाता हायस्कूल ते पी. पी. शिंदे घर ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 2 मधील वाडीलाल घर ते झोपडपट्टीपर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाढीव भाग वाखाण रोड सुनील पवार घर ते दिलीप गुरव घर ते कलबुर्गी यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड पी. डी. पाटील पार्कमधील घनश्री घरापासून ते हॉलीवूड फोटोग्राफ यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 21 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाश नगरमधील अंतर्गत रस्ते बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील रुक्मिणी इस्टेटमधील अंतर्गत रस्ते करणे बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 1 मधील दत्त मेडिकल ते मोमीन राऊंड बिल्डिंगपर्यंत रस्ता बीएम बीसी करणे 20 लाख, प्रभाग 3 मधील बुधवार पेठ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील खोजा घर ते चव्हाण घरावरून मिया नाना वस्तीपर्यंत रस्ता खड़ीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 5 मधील गुरुवार पेठेतील आशूरखाणा ते मुस्तफा सय्यद घरापर्यंत सार्वजनिक वापराच्या ठिकाणी काँक्रीट करून लादीकरण करणे 10 लाख असा एकूण 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्याकडून 27 कोटी कराड शहरासाठी :
मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी यापूर्वी येथील नियोजित धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आणखी 10 कोटी रूपये शहरातील विकासकामांसाठी मंजूर केले आहेत. तर जिल्हा नियोजन मधून अजून 9 कोटी रूपये मंजूर होणार आहेत. त्यामुळे कराड शहरासाठी एकूण 27 कोटीचा निधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मिळाला असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!