परीक्रमा ०.८ च्यावतीने शिक्षण व कोकणी संस्कृती क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव
नॉलेज टर्मिनसतर्फे आयोजित परीक्रमा हा गोव्यातील युवा ज्ञान आणि सांस्कृतिक व्यासपीठ उपक्रम असून, शिक्षण, संस्कृती आणि कोकणी चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार परीक्रमा ०.८ च्या उद्घाटन समारंभात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मडगाव येथील रवींद्र भवन येथे प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदा तीन मान्यवरांची विविध क्षेत्रातील कार्यासाठी निवड करण्यात आली आहे.
८ वा डॉ. माधवी सरदेसाई पुरस्कार कार्मेल विमेन्स कॉलेजचे प्राध्यापक विश्वप्रताप पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि युवक मार्गदर्शनासाठी जाहीर करण्यात आला आहे.
-
विद्यार्थी मृत्यू प्रकरणात पुराव्याशिवाय निष्कर्ष : विशाल पै काकोडेFebruary 3, 2026
-
५ ते १८ मार्च दरम्यान राज्यभर शिगमो महोत्सवFebruary 2, 2026
३ रा एकनाथ नाईक मांदकर पुरस्कार लोकपरंपरा अभ्यासक आणि राज्य युवा पुरस्कार विजेते चेतन खेडेकर यांना गोमंतकीय लोकपरंपरा जतन आणि प्रसारासाठी दिला जाणार आहे.
२ रा नित्यानंद नाईक संघटक पुरस्कार ज्येष्ठ कोकणी कार्यकर्ते प्रशांत कामत यांना कोकणी भाषा आणि सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्यासाठीच्या दीर्घ कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.
प्रत्येक पुरस्कारात २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, तळागाळात काम करणाऱ्या आणि युवा पिढीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा परीक्रमा उपक्रम सातत्याने पुढे नेत आहे.
परीक्रमा ०.८ हा उपक्रम ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दोन दिवस विविध सादरीकरणे आणि ज्ञानविषयक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

