‘गोव्यात सामाजिक भेदभाव नाहीत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगावमधील सभेला संबोधित करताना राज्यातील संत परंपरा आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा उल्लेख करत कौतुक केले. ऐतिहासिक लोहिया मैदान पुरावा आहे की जेव्हा, देशासाठी काही करायची वेळ येते तेव्हा गोंयकार कोणतीही कसर सोडत नाहीत, असे मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी यावेळी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाचा उल्लेख करत झेवियर यांची गोंयचा साहेब अशी ओळख असल्याचे सांगितले.
गोवा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असला तरी सामाजिक विविधतेच्या दृष्टीने खूप मोठा आहे. जेव्हा संपृक्तता येते तेव्हा भेदभाव संपतो. जेव्हा संपृक्तता येते, तेव्हा संपूर्ण लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा संपृक्तता असते तेव्हा लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
डबल इंजिन असलेले सरकार गरीब कल्याणासाठी मोठ्या योजना राबवण्याबरोबरच पायाभूत सुविधांवर विक्रमी गुंतवणूक करत आहे. आमचे सरकार गोव्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी काम करत आहे, असे मोदी म्हणाले.
मच्छिमारांसाठी आम्ही स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे. आम्हीच मत्स्यशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख मोदींनी केला.