google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘रफ्ता रफ्ता’चा टीझर झाला प्रदर्शित


अमेझॉन मिनी टीव्ही (Amazon MiniTV) , अमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आपला आगामी शो ‘रफ्ता रफ्ता’चा मजेदार टीझर प्रदर्शित केला आहे. तसेच,या सिरीजमध्ये डिजिटल सेन्सेशन भुवन बामसोबत प्रतिभावान अभिनेत्री सृष्टी गांगुली रिंदानीला पाहायला मिळेल. टीझरमध्ये नवविवाहित कपल करण आणि नित्या यांच्या आयुष्यातील झलक दिसते.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये हे जोडपे ब्रेकफास्ट दरम्यान एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असल्याचे दाखवले आहे ज्याचे रूपांतर कॉमेडी ऑफ एरर्समध्ये होते. सात भागांची ही सिरीज दैनंदिन समस्यांमधून मार्गक्रमण करत एक आकर्षक, विलक्षण आणि मजेदार अनुभव देण्याचे वचन देते.


https://www.youtube.com/watch?v=x5Guuf6s2eQ&feature=youtu.be


यावर बोलताना क्रिएटर पासून अभिनेता बनलेले भुवन बाम म्हणाले, “मी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो आणि लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत ज्ञात आणि अज्ञात कारणांमुळे खूप बदलला आहे. रोमँटिक ड्रामा उलगडणारा सर्व कंटेंट यात असून, ‘रफ्ता रफ्ता’मध्ये अनपेक्षित वळण घेऊन आधुनिक विवाहाच्या बारीक गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन मिनी टीव्ही (Amazon MiniTV) आमचा स्ट्रीमिंग पार्टनर असल्याने आम्हाला आनंद होत आहे कारण आमचा कंटेंट संपूर्ण भारतातील दर्शकांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.”


सृष्टी गांगुली रिंदानी यांनी सांगितले, “जेव्हा मला समजले की मी भुवनसोबत शोमध्ये काम करणार आहे, तेव्हा मी लगेच होकार दिला. कंटेंट क्रिएटर म्हणून आणि आता अभिनेता म्हणून मी त्यांचे नेहमीच समर्थन केले आहे. आणखी एक घटक ज्याने मला लगेच कंविन्स केले ते म्हणजे याची अनोखी कथा जी पडद्यावर विवाहित जोडप्याचा नवीन दृष्टीकोन आणते. ‘रफ्ता रफ्ता’ प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. अभी तो बस टीज़र आउट हुआ है, सीरीज़ अभी बाकी है मेरे दोस्तों!”


‘रफ्ता रफ्ता’ही एक ट्विस्ट असलेली रॉमेडी असून, भुवन बामला आपल्या उत्कृष्ट कंटेंटसह पाहण्यासाठी दर्शकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. अशातच, ‘रफ्ता रफ्ता’ही सिरीज २५ जानेवारी रोजी अमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!