महाराष्ट्र

एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’, मनसे-शिवसेनेची युती जाहीर…

: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एवढं आमचा एकमत झालेला आहे. आज सर्वांचे स्वागत करतो, आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. तर त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे, 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघे इथे बसलेलो आहोत.

आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापती मधले एक सेनापती, त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे, अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता, त्याच्या नंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उभे नाचायला लागले आणि त्यावेळी त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्षे पूर्ण होतील, इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की, मुंबईचे लचके तोडायला, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघजण दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मनसूबे आणि आता जर का आपण भांडत राहिलो ते जे काही संघर्ष आणि जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल, असंही उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!