महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस ‘कोण’ आहेत?
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान मोदींकडे सुपुर्द केले होते. उरलेला काळ चिंतनात घालवायचा आहे असे त्यावेळी कोश्यारी म्हणाले होते. त्याचबरोबर आपण यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. गेल्या अनेक विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
- रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.
- 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते.
- 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
- रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
- छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते.
- रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.