… म्हणून ‘रोड-वे सोल्युशन’ला झाला साडे तीन कोटींचा दंड
सातारा (महेश पवार) :
जावली तालुक्यात गौणखनिजांचे अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी रोड-वे सोल्युशन इंडिया कंपनीच्या क्रेशरला ३ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड जावली तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केला आहे. मात्र तहसीलदारांनी रोड-वे सोल्यूशन इंडिया कंपनीवर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
केंजळ येथील रोड-वे सोल्युशन इंडिया इन्फ्र लिमिटेड (पुणे) कंपनीचे महाबळेश्वर ते धामणेर या हमरस्त्याच्या बांधकामाकरीता गौण खनिज उत्खननाचा परवाना देण्यात आला होता. कंपनीने केंजळ येथील गट नंबर ६२/१ मधील २.११ हेक्टर आरमध्ये तात्पुरता परवाना घेऊन क्रेशर उभारणी केली आहे. या क्रेशरच्या माध्यमातून दिलेल्या परवानगीपेक्षा ३७४ ब्रास अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
त्याची दखल घेऊन रोड-वे. सोल्युशन इंडिया क्रेशरला ३ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड वाहतूक केलेल्या वाहनांचा ताबा अद्याप घेण्यात आला नाही. तसेच कंपनीने अद्याप दंडाचा आदेश होऊनही कोणतीही रक्कम शासकीस खजिन्यात जमा न केलेली नाही. त्यामुळे तहसीलदार आगामी कालावधीत कंपनीविरोधात काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.